News Flash

Video: ‘गुरुजी’ मला माफ करा !

जेव्हा युवराज सचिनपुढे नतमस्तक होतो.

जेव्हा युवराज सचिनच्या पाया पडतो.. ( छाया सौजन्य - स्टार स्पोर्ट्स )

क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरची महानता संपूर्ण क्रिकेट जगताने मान्य केलेली आहे. मैदानात सचिनच्या फलंदाजीतली आक्रमकता आतापर्यंत प्रत्येकाने अनुभवली असली तरीही सचिनने मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या विनम्र स्वभावात काही बदल केला नाही. याच कारणांमुळे जगभरातला प्रत्येक खेळाडू सचिनला मान देतो. सचिनच्या याच स्वभावाची ओळख करुन देणारा प्रसंग आज आपण पाहणार आहोत.

लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंहने एका सामन्यादरम्यान भर मैदानात सचिन तेंडुलकरचे पाय धरले होते. मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड या सामन्यात सचिन मेलबर्न क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व करत होता. तर युवराज सिंह शेन वॉर्नच्या रेस्ट ऑफ द वर्ल्ड या संघाचा भाग होता. या सामन्यात युवराजने चौफेर फटकेबाजी करत शानदार शतकी खेळीसुद्धा केली होती.

अखेर सामन्याचं ४९ वं षटक टाकण्यासाठी सचिनने स्वतः चेंडू हातात घेतला. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानंतर युवराज सिंहने सचिनला एक खणखणीत षटकार ठोकला. यावेळी युवराज सिंह आपल्या नेहमीच्या अंदाजात दिसून येत होता. मात्र काही वेळानंतर आपण ज्याला षटकार मारला तो केवळ एक खेळाडू नसून आपला गुरुही आहे याची जाणीव युवराजला झाली. यानंतर लगेचच म्हणजे पाचव्या चेंडूवर युवराज रेनशॉच्या हाती झेल देत बाद झाला. या सामन्यात युवराजने १३२ धावा केल्या. मात्र मैदानाबाहेर जाताना युवराजने केलेल्या कृतीमुळे त्याने सगळ्यांचंच मन जिंकलं.

तंबूत परतण्याच्या आधी युवराजने सचिनजवळ जाऊन त्याचे पाय धरले आणि एका अर्थाने सचिनची माफीच मागितली. यावेळी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक टाळ्या वाजवून या दोनही खेळाडूंचं कौतुक करत होता. सचिननेही एका मुलाखतीत युवराज आपल्या लहान भावाप्रमाणे असल्याचं म्हणलं होतं. दरम्यान २०१६ साली आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यातही युवराजने अशाच प्रकारे सचिनचे पाय धरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:59 pm

Web Title: mcc vs row when yuvraj singh touches sachin tendulkar feet video viral
Next Stories
1 Viral : झैनाबसोबत सेल्फी काढल्यावर क्रिकेटपटूंची कामगिरीत ‘डुलकी’… या मागचं गूढ काय?
2 icc champions trophy 2017: फायनलआधीच पाक कर्णधार सरफराजवर ‘मॅच फिक्सिंग’चे काळे ढग
3 icc champions trophy 2017: ‘त्या’ चुकीमुळं विराट कोहली धोनीवर चिडला!
Just Now!
X