News Flash

रिकी भुईचे शतक

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २६ षटकांचाच खेळ होऊ शकला.

रिकी भुईचे शतक आणि कर्णधार मोहम्मद कैफच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर आंध्र प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २१३ अशी मजल मारली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २६ षटकांचाच खेळ होऊ शकला.

यामध्ये आंध्र प्रदेशने ४३ धावांची भर घालत दोन फलंदाज गमावले.

पहिल्या दिवशीच्या २ बाद १७० धावांवरून पुढे खेळताना आंध्र प्रदेशने सावध खेळ केला. भुई आणि कैफ यांनी २१ धावांची भर घातली आणि बलविंदर सिंग संधूने ९२ व्या षटकात भुईला बाद करत ही जोडी फोडली. भुईने १३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०३ धावांची खेळी साकारली. भुईला बाद केल्यावर त्यानंतरच्याच ९४ व्या षटकात त्याने ए. जी. प्रदीपला शून्यावर बाद करत आंध्र प्रदेशला दुहेरी धक्का दिला. पण त्यानंतर मात्र कैफने संघाला सावरत सावधपणे दिवस खेळून काढला. कैफने १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८९ धावांची खेळी साकारली आहे.

 

संक्षिप्त धावफलक

आंध्र प्रदेश (पहिला डाव) : १०६ षटकांत ४ बाद २१३ (रिकी भुई १०३, मोहम्मद कैफ खेळत आहे ८९; बलविंदर सिंग संधू ३/४५) वि. मुंबई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 1:48 am

Web Title: md kaif and ricky bhui help andhra to take sizable lead against mumbai
टॅग : Ranji Match
Next Stories
1 महाराष्ट्राने हरयाणाला ३३५ धावांवर रोखले
2 आफ्रिकेच्या पाहुणचारासाठी भारत सज्ज
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा :  रोनाल्डोचा विक्रम
Just Now!
X