Medved Wrestling : बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. हंगेरीच्या मारियाना सॅस्टीन हिने तिला पराभव केला. याच स्पर्धेत भारताच्या पूजा धांडा हिनेही सहभाग घेतला होता. तिने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत साक्षी मलिक हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या स्पर्धेत अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक पटकावण्याची साक्षीची इच्छा होती. त्यानुसार तिने स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण अखेर पुन्हा तिचे सुवर्णपदक विजयाचे स्वप्न भंगले. हंगेरीच्या मारियाना सॅस्टीनने ६-२ असे साक्षीला पराभूत केले. या स्पर्धेत तिने उपांत्य फेरीत अजरबैजानच्या एलमिरा गैमबारोवाचा ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र जेतेपदाच्या लढतीत तिला अपयश आले.

याशिवाय, ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने १०-० असा एकतर्फी विजय मिळवला. तिने अमेरिकेच्या केल्सी कॅम्बेल हिला पराभूत करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medved wrestling tournament sakshi malik won silver puja dhanda won bronze
First published on: 17-09-2018 at 14:13 IST