29 October 2020

News Flash

मेघालयच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, एकाच डावात घेतले १० बळी

विजय मर्चंट करंडकात केली कामगिरी

मेघालयचा फिरकीपटू निर्देश बैसोयाने स्थानिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. १६ वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळत असताना नागालँड संघाविरोधात निर्देशने एकाच डावात १० बळी घेतले आहे. १५ वर्षीय निर्देश हा मुळचा मेरठचा असून काही वर्षांपूर्वी त्याने मेघालयकडून खेळण्यास सुरुवात केली आहे.

निर्देशने नागालँडविरुद्ध सामन्यात पहिल्या डावात २१ षटकं टाकून ५१ धावा देत १० बळी घेतले. निर्देशने २१ पैकी १० षटकं निर्धाव टाकली होती. निर्देशच्या कामगिरीमुळे नागालँडचा संघ पहिल्या डावात ११३ धावांवर गारद झाला. यानंतर पहिल्या दिवसाअखेरीस प्रत्युत्तरादाखल मेघालयने ४ गड्यांच्या मोबदल्यात १०९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

एकाच डावात १० बळी घेणं ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनाच कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये देबाशिष मोहंती, सुभाष गुप्ते, प्रदीम सुंदरम आणि पी.एम.चॅटर्जी यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी मणिपूरच्या रक्स सिंहने १९ वर्षाखालील कूच बिहार करंडक स्पर्धेत १० बळी घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 10:32 am

Web Title: meghalaya spinner takes 10 wicket in an innings psd 91
Next Stories
1 ऋषभ पंत अजुनही लहान, त्याला बऱ्याच गोष्टी शिकणं गरजेचं – डीन जोन्स
2 IPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मिळालं नवीन घर, या मैदानावर खेळणार सामने
3 सायनाचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X