19 February 2020

News Flash

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा : नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद

डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले.

| September 11, 2019 12:56 am

मेहुली घोष

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

 

First Published on September 11, 2019 12:56 am

Web Title: mehuli ghosh wins title in national shooting trials zws 70
Next Stories
1 Pro Kabaddi 7 : प्ले-ऑफ आणि अंतिम फेरीचा सामना रंगणार ‘या’ शहरात
2 Pro Kabaddi 7 : यू मुम्बाची तेलगू टायटन्सवर मात
3 वन-डे क्रिकेटसाठी तयार, मात्र सध्या कसोटीकडेच लक्ष – हनुमा विहारी
Just Now!
X