ब्यूनस आयर्स : लिओनेल स्कालोनी यांच्या मार्गदर्शनाखालील अर्जेटिना संघात आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी बार्सिलोनाचा आघाडीवीर लिओनेस मेसी आणि सर्जियो अ‍ॅग्युरो यांचा समावेश करण्यात आला आहे.

पॅरिस सेंट-जर्मेनचा अव्वल खेळाडू अँजेल डी मारिया याचाही २३ जणांच्या संघात समावेश करण्यात आला असला तरी आघाडीवीर गोन्झालो हिग्यूएनला स्थान मिळू शकले नाही. ‘‘राष्ट्रीय संघासाठी ही स्पर्धा खूपच महत्त्वाची असल्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकाला समाधान देणे फारच कठीण आहे,’’ असे स्कालोनी यांनी सांगितले. १४ जूनपासून ब्राझील येथे सुरू होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेटिनाचा ब गटात कोलंबिया, पॅराग्वे आणि पाहुण्या कतार (२०२२ विश्वचषकाचे आयोजक) या संघांसह समावेश करण्यात आला आहे.

मेसीने आठ महिन्यांच्या कालावधीनंतर अर्जेटिना संघात पुनरागमन केले आहे. तर इंटर मिलानचा आघाडीवीर मौरो इकार्डीला संघातून वगळण्यात आले आहे.

अर्जेटिना संघ

* गोलरक्षक : ऑगस्टिन मार्चेसिन, फ्रान्को अर्मानी, इस्तबेन अँड्राडा.

बचावफळी : जर्मन पेझ्झेला, हुआन फॉयथ, निकोलस ओटामेंडी, निकोलस टॅग्लियाफिको, मार्कस अ‍ॅक्युना, रेंझो साराविया, रामिरो फ्युनेस मोरी, मिल्टन कास्को.

* मधली फळी : लिआंड्रो पॅरेडेस, अँजेल डी मारिया, गायडो रॉड्रिगेझ, जिओवानी लो सेल्सो, रॉबेटरे पेरेयरा, रॉड्रिगो डे पॉल, इक्वेझाइल पॅलासियस.

* आघाडीची फळी : लिओनेल मेसी, सर्जियो अ‍ॅग्युरो, पावलो डायबाला, लॉटारो मार्टिनेझ, मटियास सुआरेझ.