29 October 2020

News Flash

मेस्सीचे ब्राझीलमध्ये भाडय़ाने घर घेण्याचे स्वप्न अधुरे

सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकामुळे ब्राझीलमधील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. जगातील सर्वाधिक कमाई असलेला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीलाही त्याचा फटका बसला.

| June 14, 2014 03:23 am

सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकामुळे ब्राझीलमधील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. जगातील सर्वाधिक कमाई असलेला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीलाही त्याचा फटका बसला. आपल्या कुटुंबियांसाठी विश्वचषकादरम्यान बेलो होरिझोन्टे येथे एक महाल भाडय़ाने घेण्याचा विचार मेस्सीने रद्द केला.
मेस्सी आणि त्याच्या सहयोगी कर्मचाऱ्यांसाठी २१,५०० चौरस फुटांचा महाल भाडय़ाने घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण एका महिन्याच्या वास्तव्यासाठी ६७,६०० डॉलर खर्च करणे मेस्सीला महागडे वाटले. हे भाडे कमी करण्याची विनंती या कर्मचाऱ्यांनी महालाच्या मालकाला केली होती. महाल भाडय़ाने घेण्यासंदर्भातील बोलणी मे महिन्यात फिस्कटली, असे सूत्रांनी सांगितले.
‘‘मेस्सीच्या सहयोगी कर्मचाऱ्यांनी दिलेली ऑफर मला आवडली नाही. त्यामुळेच हा करार होऊ शकला नाही,’’ असे मालक पावलो नासीफ यांनी सांगितले. मेस्सीचे व्यवस्थापन सांभाळणारे त्याचे वडील जॉर्ज आणि नासीफ यांच्यातील बोलणी यशस्वी होऊ शकली नाहीत. अर्जेटिना संघातील प्रवक्त्याने याबाबत बोलणे टाळले. विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या अर्जेटिना संघाचा मुक्काम ब्राझीलमधील तिसऱ्या मोठय़ा शहरात म्हणजेच बेलो होरिझोन्टे येथे आहे. गेल्या काही वर्षांत ब्राझीलमधील जागांचे भाव कित्येक पटीने वाढले आहेत. रिओ द जानेरो आणि साओ पावलो येथील जागांचे दर हे न्यू यॉर्क, लंडन आणि पॅरिसइतके आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 3:23 am

Web Title: messi balks at sky high rent for brazil mansion
टॅग Fifa World Cup
Next Stories
1 मेक्सिकोचा विजयारंभ
2 उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण वाहिनीद्वारे बेरंग
3 गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित शाह
Just Now!
X