बार्सिलोनाने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉल खेळ करत चॅम्पियन्स लीगमध्ये युव्हेंटसला २-० असे पराभूत केले. मेसीने पेनल्टीवर केलेला गोल बार्सिलोनाच्या  विजयात मोलाचा ठरला.

लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील ही लढत म्हणून याकडे पाहण्यात येत होते. मात्र रोनाल्डो करोनाबाधित असल्याने तो या लढतीत खेळला नाही. मात्र मेसीने नेहमीप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी केली. याउलट रोनाल्डोच्या जागी युव्हेंटस संघात निवड झालेल्या इवारो मोराटाचे तीन गोल ऑफसाइड असल्याने रद्द करण्यात आले. याउलट बार्सिलोनाने १४व्या मिनिटालाच ओस्माने डेम्बलेच्या गोलवर १-० आघाडी घेतली होती. गोल करण्याच्या काही संधी युव्हेंटसलाही मिळाल्या. मात्र त्यात ते अपयशी ठरले.