News Flash

‘मेसी सामन्याआधी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका

'मेसी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला जातो, त्याला आपण लीडर कसं काय म्हणायचं...'

लिओनेल मेसी

अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो यात श्रेष्ठ कोण हा वाद फुटबॉलप्रेमींसाठी नवीन नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी सांग निवडायचा असेल तर त्यासाठी रोनाल्डोपेक्षा मेसीला संघात स्थान देईन असे म्हटले होते. पण अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोना यांनी मात्र मेसीवर टीका केली आहे. मेसी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला जातो, त्याला आपण लीडर कसं काय म्हणायचं असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार लिओनेल मेस्सीच्या खेळावर टीका करण्यात आली होती. मात्र, हाच मेसी बार्सिलोना क्लबकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. राष्ट्रीय संघाकडून खेळताना मेसीवर प्रचंड दबाव असतो. मेसी सामन्याआधी २० वेळा बाथरूमला जातो. म्हणूनच त्याच्या कामगिरीवर परिणाम होतो, अशी टीका मॅरोडोना यांनी केली आहे.

राष्ट्रीय संघाकडून खेळणारा आणि बार्सिलोना क्लबकडून खेळणारा मेसी हा वेगवेगळा असतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तोच मुद्दा मॅरोडोना यांनीही मांडला. बार्सिलोनाकडून खेळणारा मेसी अर्जेंटिनाकडून खेळताना वेगळा असतो. तो चांगला खेळाडू आहे. पण त्याच्या नेतृत्वगुण नाहीत. कोणताही सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधाराने आपल्या संघाचे मनोबल वाढवायचे असते. पण हा स्वतःच २० वेळा टॉयलेटला जातो, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 4:24 pm

Web Title: messi is not a leader goes to the bathroom 20 times before a game says great diego maradona
टॅग : Lionel Messi
Next Stories
1 कसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा
2 Pro Kabaddi Season 6 : जाणून घ्या आतापर्यंतचे सर्वोत्तम 5 चढाईपटू
3 Youth Olympics : भारतीय युवा हॉकीला चंदेरी यश
Just Now!
X