मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसी संघाच्या सरावाला मुकला. स्पेनमधील ला-लिगा फुटबॉल १३ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मेसीच्या तंदुरुस्तीबाबत शंका आहे. मेसीने बार्सिलोनाच्या संघ सहकाऱ्यांसोबत सराव न करता स्वतंत्ररीत्या सराव केला. बार्सिलोनाची १३ जूनला मॅर्लोकाविरुद्ध लढत होत आहे.