15 August 2020

News Flash

मेस्सी, नेयमार, सुआरेज १०० गोल्सच्या उंबरठय़ावर

ला लीगा, चॅम्पियन्स लीग या स्पर्धामध्ये बार्सिलोना संघाचे नाणे सध्या चांगलेच खणखणत आहे. संघाच्या विजयात सांघिक खेळाला जितके महत्त्व, तितकेच आघाडीपटूंनाही आहे.

| April 29, 2015 12:37 pm

ला लीगा, चॅम्पियन्स लीग या स्पर्धामध्ये बार्सिलोना संघाचे नाणे सध्या चांगलेच खणखणत आहे. संघाच्या विजयात सांघिक खेळाला जितके महत्त्व, तितकेच आघाडीपटूंनाही आहे. आघाडीपटू आक्रमक आणि चतुर असलेल्या संघाला प्रतिस्पर्धीची बचावफळी भेदणे सहज शक्य होते. हेच तंत्र बार्सिलोनाने गेली कित्येक वर्षे वापरले. त्यामुळेच त्यांची सवरेत्कृष्ट आघाडीपटूंची फळी कोणती हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या त्यांच्याकडे लिओनेल
मेस्सी, नेयमार आणि लुईस  सुआरेज या दक्षिण अमेरिकन आघाडीपटूंची फळी असून या तिघांनी मिळून यंदाच्या वर्षांमध्ये ९७ गोल लगावण्याची किमया साधली आहे.
 बार्सिलोनाकडून सर्वाधिक गोल्स करण्याच्या आघाडीपटूंच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी मेस्सी-नेयमार-सुआरेजला केवळ तीन गोल्सची आवश्यकता आहे. २०१४-१५ या हंगामात या तिघांनी मिळून ९७ गोल्सची नोंद केली आहे. बार्सिलोनाकडून २००८-०९ या हंगामात मेस्सी-थिएरी हेनरी-सॅम्युअल्स इटोस यांच्या ९९ गोल्सचा विक्रम मोडण्याची संधी या त्रिकुटांना आहे.

२००८-०९ मेस्सीने २००८-०९च्या हंगामात दमदार सुरुवात करत ५१ सामन्यांत ३८ गोल्स केले होते, तर इटोसने ५२ सामन्यांत ३६ वेळा चेंडू यशस्वीपणे गोलजाळीत पोहोचवला होता. या शर्यतीत हेन्री कुठेच मागे नव्हता, त्यानेही ४२ सामन्यांत २५ गोल्स केले आहेत. मेस्सी-इटोस-हेन्री यांनी बार्सिलोनाला ला लीगा, कोपा आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही पटकावून दिले होते.

२०१४-१५ आत्तापर्यंत मेस्सी-नेयमार-सुआरेज या आघाडीपटूंनी २०१४-१५ च्या हंगामात  ९७ गोल्स केले आहेत. त्यात मेस्सीने ४८ सामन्यांत ४७, नेयमारने ४२ सामन्यांत ३१ गोल्स केले आहेत. विश्वचषकात इटलीच्या गिऑर्जीओ चिऐलीनीचा चावा घेतल्यामुळे दोन महिन्यांच्या बंदीची शिक्षा भोगणाऱ्या सुआरेजने ३६ सामन्यांत १९ गोल्स केले आहेत.
spt06

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2015 12:37 pm

Web Title: messi suarez and neymar have now scored 100 goals this season
Next Stories
1 विश्व टेबल टेनिस स्पर्धा : जी. साथीयनची मुख्य फेरीत धडक
2 ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करीन – आवारे
3 बांगलादेशची दमदार सुरुवात
Just Now!
X