News Flash

समाजमाध्यमांवरील बहिष्काराचे मेसीकडून समर्थन

इंग्लिश फुटबॉलमध्ये संघ, खेळाडू तसेच प्रशिक्षकांनी समाजमाध्यमांवर बहिष्कार घालण्याचे ठरवले असून मेसीने त्याला पाठिंबा दर्शवला आहे

ऑनलाइनद्वारे होणारी वर्णद्वेषी शेरेबाजी आणि सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेसीने आपल्या असंख्य चाहत्यांना पावले उचलण्यास सांगितले आहे. इंग्लिश फुटबॉलमध्ये संघ, खेळाडू तसेच प्रशिक्षकांनी समाजमाध्यमांवर बहिष्कार घालण्याचे ठरवले असून मेसीने त्याला पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘कुणीही आपला अपमान खपवून घेत नाही. सध्या समाजमाध्यमांवर एकमेकांना अपमानित करण्याचे प्रकार वाढले असून ते रोखण्याच्या दिशेने कुणीही पावले टाकत नाही. त्यामुळे अशा गैरकृत्यांना वेळीच आळा घालणे योग्य ठरेल,’’ असे मेसीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:21 am

Web Title: messi support boycott social media ssh 93
Next Stories
1 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल
2 खो-खोच्या प्रगतीचे भवितव्य अधांतरी!
3 माजी अश्वारोहक गुलाम मोहम्मद खान यांचे निधन
Just Now!
X