03 March 2021

News Flash

सर्वाधिक गोलसाठी मेस्सी व रोनाल्डो यांच्यात चुरस

सध्या अतिशय फॉर्ममध्ये असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याची संधी आहे, मात्र त्यासाठी त्याच्यापुढे लिओनेल मेस्सीचे आव्हान असणार आहे.

| February 21, 2015 05:12 am

सध्या अतिशय फॉर्ममध्ये असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याची संधी आहे, मात्र त्यासाठी त्याच्यापुढे लिओनेल मेस्सीचे आव्हान असणार आहे.
रोनाल्डोच्या सुरेख कामगिरीमुळेच त्याच्या रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीगमध्ये शाल्के संघाविरुद्ध २-० असा विजय मिळविता आला. माद्रिद संघाचे प्रशिक्षक कालरे अँसेलोटी म्हणाले, ‘‘रोनाल्डोला गोल करता आला नाही तरी त्याच्या सहकार्यामुळे आमच्या अन्य खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळते व प्रतिस्पर्धी संघाला चिवट लढत देण्यासाठी सतत प्रेरणाही मिळते. तसेच संघाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे.’’
लीगमध्ये माद्रिद संघाने बार्सिलोनापेक्षा एक गुणाची आघाडी घेतली आहे. त्यांची आता रविवारी एल्चे संघाशी गाठ पडणार आहे. बार्सिलोना संघास घरच्या मैदानावर मलागा संघाशी खेळावे लागणार आहे. रोनाल्डोने आतापर्यंत २८ गोल केले आहेत.
 मेस्सीने आतापर्यंत २६ गोल केले आहेत. या मोसमातील सर्व स्पर्धामधील कामगिरी पाहिल्यास दोन्ही खेळाडूंनी ३४ सामन्यांमध्ये प्रत्येकी ३७ गोल केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 5:12 am

Web Title: messi vs ronaldo goals
Next Stories
1 आनंदला उपविजेतेपद
2 मुंबई उपांत्य फेरीत
3 पहिल्या डावातील आघाडीमुळे तामिळनाडू उपांत्य फेरीत
Just Now!
X