21 February 2019

News Flash

लसिथ मलिंगालाही #MeTooचा यॉर्कर, मुंबईत घटना घडल्याचा आरोप

भारतीय गायिका चिन्मयी श्रीप्रदा हिने ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात तिने मलिंगावर आरोप केले आहेत.

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते-अभिनेत्री यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले जात आहेत. ही मोहीम इतर क्षेत्रांतही जोर धरू लागली असून यात आता क्रीडापटुंवरही आरोप केले जात आहेत. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आल्याचा विषय शांत होतो न होतो तोच वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्यावरही आता अत्याचाराचे आरोप लावण्यात आले आहेत.

भारतीय गायिका चिन्मयी श्रीप्रदा हिने ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मलिंगावर तिने केला आहे. IPLच्या एका हंगामात मलिंगा मुंबईच्या हॉटेलमध्ये होता. त्यावेळी त्याने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या पत्रात म्हंटले आहे.

First Published on October 11, 2018 3:22 pm

Web Title: metoo lasith malinga accused of sexual assault by indian playback singer chinmayi sripaada
टॅग Lasith Malinga