ब्राझीलच्या आक्रमणाला समर्थपणे थोपवणारा मेक्सिकोचा २८ वर्षीय गोलरक्षक गिलेर्मो ओचोआचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मेक्सिकोची आघाडीची गायिका थालिया हिने तर त्याच्या खेळावर भाळून थेट विवाहाचाच प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला आहे. यजमान ब्राझीलच्या संघाचे गोल करण्याचे प्रयत्न आपल्या लाजवाब गोलरक्षणाने ओचोआने हाणून पाडले. त्यामुळे मेक्सिकोने ब्राझीलला गोलशून्य बरोबरीत रोखले. ओचोआचे जसे मेक्सिकोमध्ये गुणगान गायले जात आहे, तसेच सोशन मीडियावरही त्याच्या कामगिरीची जोरदार चर्चा होते आहे. त्याच्याच देशातील गायिका थालिया हिनेसुद्धा ‘ट्विटर’च्या माध्यमातून ओचोआला विवाहाची मागणी घातली आहे. ‘‘ओचोआ, माझ्याशी लग्न कर!’’ या ओळीसह त्याचे छायाचित्रसुद्धा तिने पोस्ट केले आहे.