07 March 2021

News Flash

आठ फुटबालपटूंना करोनाची बाधा झाल्याने मेक्सिकोतील लीग अडचणीत

मेक्सिकोतील सांतोस लागुना या अव्वल संघातील आठ फुटबॉलपटूंना करोनाची बाधा झाल्याचे क्लबने म्हटले आहे.

मेक्सिको : मेक्सिकोतील सांतोस लागुना या अव्वल संघातील आठ फुटबॉलपटूंना करोनाची बाधा झाल्याचे क्लबने म्हटले आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या स्थगितीनंतर आता लिगा एमएक्स ही मेक्सिकोची राष्ट्रीय फुटबॉल लीग पुन्हा सुरू करतानाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आठवडय़ाच्या अखेरीस ही लीग सुरू होणार होती. पण आता सरावाला सुरुवात करण्यासाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. ४८ खेळाडू व प्रशिक्षकांच्या करोनाबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी २२ जणांचे अहवाल आले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असे सांतोस लागुनाचे मालक अलेजांड्रो इरारागोरी यांनी सांगितले.

जर्मन महिला फुटबॉल लीग २९ मेपासून

कलोग्न : जर्मनीतील महिलांची फुटबॉर्ल स्पर्धा २९ मेपासून बंद दाराआड सुरू होणार आहे, असे जर्मन फुटबॉल महासंघाने सांगितले. ‘‘पुरुषांची लीग गेल्या आठवडय़ात सुरू झाल्यानंतर आता महिलांची बुंडेसलीगा या आठवडय़ात सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे महासंघाचे अध्यक्ष फ्रिट्झ केलर यांनी सांगितले

कोरिया फुटबॉल क्लबला विक्रमी दंड

स्योल : बंद दाराआड सामना सुरू असताना रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी प्रौढांसाठी लैंगिक खेळणे म्हणून वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या स्टेडियममध्ये आणल्याबद्दल एफसी स्योल या दक्षिण कोरियातील क्लबला जवळपास ६२ लाख रुपयांचा विक्रमी दंड ठोठावण्यात आला आहे. असे कृत्य करून क्लबने महिला चाहत्यांचा अपमान केला आहे, असे के-लीगच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एफसी स्योलने आपली चूक मान्य केली असून पुन्हा असे कृत्य घडणार नाही, असे आश्वासन दिले आहे. या बाहुल्यांच्या वितरकाने के-लीगच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी या बाहुल्या मोफत पुरवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एफसी स्योलने याबाबत पहिले पाऊल उचलले. के-लीगच्या नव्या मोसमाला बंद दाराआड ८ मेपासून सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:07 am

Web Title: mexico league in trouble after eight footballers were hit by a corona zws 70
Next Stories
1 पावसाळ्यानंतरच देशात क्रिकेट सुरू!
2 राष्ट्रीय क्रीडा संघटना मात्र उदासीन
3 आता आयसीसीमध्ये ‘दादा’गिरी? अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य उमेदवार – ग्रॅमी स्मिथ
Just Now!
X