News Flash

VIDEO : उत्तुंग..! पोलार्डने ठोकला हंगामातील सर्वात मोठा षटकार

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पोलार्डची 35 धावांची नाबाद खेळी

कायरन पोलार्ड

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आयपीएलच्या 9व्या सामन्यात नवीन विक्रम नोंदवला आहे. आयपीएलमध्ये 200 किंवा अधिक षटकार मारणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने नाबाद 35 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पोलार्डच्या खेळीमुळे मुंबईला हैदराबादसमोर 20 षटकात 150 धावा करता आल्या.

आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 351 षटकार ठोकले आहेत. पोलार्ड आणि विराट कोहली या दोघांनीही 201 षटकार ठोकले आहेत. मात्र, कमी सामने खेळल्यामुळे पोलार्ड त्याच्या पुढे आहे. पोलार्डने 167 सामन्यात तर कोहलीने 194 सामन्यात 200 षटकार ठोकले आहेत. याशिवाय एबी डिव्हिलियर्सने 237, रोहित शर्मा 218 आणि महेंद्रसिंह धोनीने 216 षटकार लगावले आहेत.

 105 मीटर ….

 

कायरन पोलार्डने या डावात 105 मीटर लांब षटकार ठोकला. हा या हंगामातील सर्वात मोठा षटकार ठरला. पोलार्डने 17व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऑफ स्पिनर मुजीब उर रेहमानला हा षटकार ठोकला. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ग्लेन मॅक्सवेलने सर्वात लांब षटकार नोंदवण्याचा विक्रम केला होता. त्याने 100 मीटर लांबीचा षटकार ठोकला होता. या व्यतिरिक्त मुंबईच्या सूर्यकुमार यादवने 99 मीटर लांबीचा षटकार ठोकला आहे.

असा रंगला सामना

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. मु्ंबईकडून रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक आणि कायरन पोलार्ड यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आणला. पोलार्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:00 am

Web Title: mi batsman kieron pollard hit double century of sixes in ipl adn 96
Next Stories
1 MI vs SRH : मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी, हैदराबादवर 13 धावांनी केली मात
2 खरा Hit Man… रोहित शर्माने धोनीला मागे टाकत स्वत:च्या नावावर नोंदवला अनोखा विक्रम
3 MI vs SRH IPL 2021 Live Update : चेन्नईत हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक
Just Now!
X