News Flash

Mumbai Indians चा ‘हा’ खेळाडू आहे अभिषेक बच्चनचा फेव्हरेट!

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अभिषेक बच्चनचा एक फेव्हरेट खेळाडू आहे.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज चेन्नईत IPL 2021 चा सामना रंगणार आहे. सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करणारा Mumbai Indians चा संघ चेन्नईत विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अभिषेक बच्चन हा सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा चाहता राहिलेला आहे. त्यामुळे यंदा देखील अभिषेकनं मुंबई इंडियन्सला फुल्ल ऑन सपोर्ट केला आहे. पण त्यातही Abhishek Bachchan चा एक फेव्हरेट खेळाडू आहे, ज्याच्यावर पूर्ण टीमची भिस्त आहे, असं त्याचं म्हणणं आहे. पण हा खेळाडू भारतीय नसून तो एक परदेशी खेळाडू असल्याचं त्यानं सांगितलं आहे. झीनं स्टार स्पोर्ट्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अभिषेक बच्चन आजच्या सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवरच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये उपस्थित राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अभिषेक बच्चननं आपल्या फेव्हरेट खेळाडूचं नाव सांगितलं आहे.

डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊनही विराट खेळत राहिला!

मुंबई इंडियन्सला अजूनही आयपीएलमध्ये विजयाचं खातं उघडण्याची प्रतिक्षा असून आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने रोहित शर्माची मुंबई पलटन चेन्नईमध्ये विजयाची गुढी उभारणार का? याची उत्सुकता मुंबई इंडियन्सच्या तमाम क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

भज्जी.. पोलार्ड.. की…!

दरम्यान, स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, “भज्जी माझा मित्र आहे. जेव्हा तो खेळत होता, तेव्हा तो जबरदस्त होता. पॉली (Pollard) मात्र मुंबई इंडियन्सची ताकद असून त्यांचा आधार आहे. तो माझा फेव्हरेट आहे. पण त्याच वेळी मला वाटतं कोणताही मुंबई इंडियन्सचा फॅन आपला फॅन्टॅस्टिक कॅप्टन रोहित शर्माशिवाय कुणाला निवडू शकणार नाही”, असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची ‘ती’ लाजिरवाणी परंपरा कायम!

सलग ९व्यांदा गमावला सलामीचा सामना!

मुंबई इंडियन्सनं आजपर्यंत झालेल्या सीजनपैकी ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यंदा देखील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सला पसंती दिली जात आहे. मात्र, गेल्या ८ मोसमांप्रमाणेच यंदा देखील मुंबई इंडियन्सने आपला सलामीचा सामना गमावलेला आहे. त्यामुळे ती परंपरा देखील मुंबई इंडियन्सने कायम राखली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 6:27 pm

Web Title: mi vs kkr ipl 2021 match kieron pollard not rohit sharma abhishek bachchans favorite pmw 88
Next Stories
1 IPL 2021 : “धोनीला दंड झाला, मग राहुल आणि सॅमसनला…!” दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर आकाश चोप्रांचं ट्वीट!
2 IPL 2021 : चेन्नईत विजयाची गुढी उभारण्यासाठी मुंबई सज्ज
3 ‘‘…तर, वर्ल्डकपसाठी हरभजनची भारतीय संघात निवड व्हावी’’
Just Now!
X