ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने जॉन बुकनन यांची तुलना आपल्या कुत्र्याशी केल्याने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. जॉन बुकनन हे आस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. मायकल क्लार्कने ‘अॅशेज डायरी २०१५’नावाचे पुस्तक लिहले आहे. आस्ट्रेलियन संघ इतका मजबूत होता की माझा कुत्रा जेरी संघाचा प्रशिक्षक असता तरी आम्हीच जगजेत्ते झालो असातो. तसेच जॉन बुकनन कधीच देशासाठी खेळले नसल्याचे मायकल क्लार्कने आपल्या पुस्तकात लिहले आहे.
आस्ट्रेलियन संघातील काही खेळाडू मद्यपान करुन सामना खेळत असल्याचा उल्लेख करत मैथ्यू हेडन आणि एंड्र्यू साइमंड्स या दोन ऑस्ट्रेलीयन क्रिकेटपटूंची बरीच निंदा मायकलने आपल्या पुस्तकातून केली आहे.
२००९ साली इंग्लंडमध्ये एंड्रूयू साइमंड्सने मद्यपान केले होते त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याचा करार रद्द केल्याचा दावा क्लार्कने केला आहे. ज्याला देशासाठी खेळणे म्हणजे काय? हे माहीत नसणारा व्यक्ती माझ्या कर्णधार पदावर बोट ठेवतो हे हास्यास्पद क्लार्कने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. एशेज मालिकेमध्ये वारंवार होणाऱ्या खराब कामगीरीमुळे माइकल क्लार्कच्या कर्णधार पदावर टीका होत होती.
माझ्या १२ वर्षाच्या कारकीर्दीत मी काय करु शकतो हे क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे. ३८९ नंबरची जर्सी माझ्यासाठी इतकी महत्वाची होती की जर रिकी पाँटिंगने मला हार्बर पुलावरुन उडी मारायला सांगीतले असते तरी मी मारली असती. असे मायकल क्लार्कने ‘अॅशेज डायरी २०१५’ या पुस्तकात लिहले आहे.