News Flash

मायकेल फेल्प्स लवकरच विवाहबंधनात

ऑलिम्पिकमध्ये विक्रमी सुवर्णपदके जिंकणारा जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

| February 24, 2015 02:04 am

ऑलिम्पिकमध्ये विक्रमी सुवर्णपदके जिंकणारा जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २०१० ची मिस कॅलिफोर्निया असलेली निकोली जॉन्सन हिच्याशी त्याचा नुकताच साखरपुडा झाला. फेल्प्सने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत अठरा सुवर्णपदकांसह २२ पदकांची कमाई केली आहे. विवाहासंबंधीच्या वृत्तांबाबत फेल्प्सने ट्विटरद्वारा म्हटले आहे, आमचा नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच आम्ही विवाहबंधनात गुंफणार आहोत. जॉन्सन हिनेदेखील ‘ट्विटर’द्वारा या वृत्तास दुजोरा दिला आहे. अतिरिक्त मद्यपान करीत मोटार चालविल्याबद्दल फेल्प्सवर कारवाई करण्यात आली असून सहा महिने त्याला कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये तो स्पर्धामध्ये भाग घेऊ शकेल. तो १५ ते १८ एप्रिलदरम्यान अ‍ॅरिझोना येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 2:04 am

Web Title: michael phelps and nicole johnson get engaged
Next Stories
1 अपघातामुळे अक्षय गिरप उपांत्य फेरीला मुकणार
2 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या नियमांमध्ये सुधारणा
3 सोमदेवला विजेतेपद
Just Now!
X