18 September 2020

News Flash

‘फॉर्म्युला-वन’चा सम्राट मायकेल शूमाकर कोमातून बाहेर

फॉर्म्युला-वन कार रेसिंगचा स्टार आणि सात वेळा जगज्जेता ठरलेला मायकल शूमाकर कोमातून बाहेर आला असून त्याला दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे.

| June 16, 2014 03:47 am

फॉर्म्युला-वन कार रेसिंगचा स्टार आणि सात वेळा जगज्जेता ठरलेला मायकल शूमाकर कोमातून बाहेर आला असून, त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामध्ये स्कीइंग करताना शूमाकरला जबरदस्त अपघात झाला होता. या अपघातात शूमाकरचे डोके एका खडकावर आदळल्याने त्याच्या मेंदूला जबर मार लागून तो कोमात गेला होता.
मायकल शूमाकर हा सातवेळा ‘फॉर्म्युला वन’ चा चॅम्पियन राहिलेला आहे. शूमाकरच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शूमाकरला सध्या पुनर्वसन केंद्रामध्ये हलविण्यात आले असून, तिथेच त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 3:47 am

Web Title: michael schumacher out of coma and released from hospital
Next Stories
1 स्वित्र्झलडचा निसटता विजय
2 ‘वॅग्स’ की दुनिया
3 भारतीय युवा खेळाडूंची परीक्षा
Just Now!
X