इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेविषयी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. मायकेल वॉनच्या या भविष्यवाणीवर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाला वॉन?

मायकेल वॉनचा असा विश्वास आहे की, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 3-0ने विजय मिळवेल. वॉनच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड संघात कसोटी संघाचा कर्णधार जो रूट आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल आणि ते मालिका जिंकू शकतात. मायकेल वॉनने ट्विटद्वारे ही भविष्यवाणी केली.

 

आकाश चोप्राचे उत्तर

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मायकेल वॉनच्या या भविष्यवाणीला प्रतिसाद दिला. तो म्हणाला, भारतीय संघातही मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजासारखे दिग्गज खेळाडू नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका अजिबात सोपी असणार नाही.

 

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील अनेक मोठे खेळाडू या मालिकेबाहेर आहेत. इंग्लंडचा संघ सध्या रोटेशन पॉलिसीखाली कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संधी दिली जात आहे.

दुसरीकडे, भारतीय संघात जसप्रीत बुमराह गैरहजर आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा जखमी झाले होते. ते अद्याप दुखापतीतून सावरलेले नाही, हे दोन्ही खेळाडू आयपीएलदरम्यान पुनरागमन करू शकतात.