इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आपल्या एका ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वॉनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरू होण्यापूर्वी पावसाबाबत एक विधान केले. पावसाने टीम इंडियाला वाचवले, असे ट्वीट वॉनने केले. या ट्वीटवर भारतीय चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू होणार होता, मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

मायकेल वॉन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”हवामानामुळे भारत वाचला, हे मला दिसून आले.” याआधीही वॉन आपल्या वक्तव्यामुळे बऱ्याच वेळा ट्रोल झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही वॉनला ट्रोल केले होते.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

 

वॉनच्या ट्वीटवर भारतीयांच्या प्रतिक्रिया –

 

 

 

 

 

१८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही झाली नाही. या सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. जर ४ दिवसात निकाल लागला नाही. तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होणार होता. मात्र पावसामुळे पंचांनी काही काळ वाट बघितली. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने आजच्या दिवशीचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊलमध्ये आतापर्यंत ६ कसोटी सामने झाले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ दोनदा सामना जिंकला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ एकदाच सामना जिंकला आहे.