विशेष प्रवेशिकेद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेत नितीनकुमार सिन्हाने आशियाई कुमार टेनिस स्पर्धेतील मुलांच्या एकेरीत, तर मुलींमध्ये महाराष्ट्राच्या मिहिका यादवने अिजक्यपद पटकावले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित केलेल्या स्पध्रेत मुलींमध्ये महाराष्ट्राच्या मिहिका यादवला विजेतेपद मिळवताना अडचण आली नाही. तिने आपलीच सहकारी महक जैनला ६-३, ६-३ असे हरविले. दोन्ही सेट्समध्ये तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत सव्र्हिसब्रेक मिळवला. विजेतेपदानंतर ती म्हणाली, ‘‘विजेतेपद मिळवण्याचा आत्मविश्वास होता. सकारात्मक वृत्ती ठेवली की आपोआप आपली कामगिरी चांगली होते असा माझा अनुभव आहे. सव्र्हिस व परतीचे फटके यावर मी नियंत्रण शेवटपर्यंत राखले, त्यामुळेच मी विजयी झाले.’’
बंगालच्या सिन्हाने उत्कंठापूर्ण अंतिम लढतीत मलेशियाच्या ख्रिस्तियन दीदीअरचा पराभव केला. सव्वादोन तास चाललेल्या या सामन्यात त्याने ६-४, ४-६, ६-२ असा विजय मिळविला. सिन्हाने पहिल्या व तिसऱ्या सेटमध्ये जमिनीलगत परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये त्याला सव्र्हिसवर नियंत्रण राखता आले नाही. तिसऱ्या सेटमध्ये त्याने नेटजवळून प्लेसिंगचा सुरेख खेळ केला व विजयश्री खेचून आणली. त्याला विजेतेपदाबरोबरच १८० गुणांची कमाई झाली.
‘‘आक्रमक हाच सर्वोत्तम बचाव असतो असे मानूनच मी खेळ केला. एरवी डेव्हिसपटूंबरोबर मी सराव करीत असतो. त्याचा फायदा मला येथे मिळाला,’’ असे विजेतेपदानंतर सिन्हाने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 2:27 am