09 March 2021

News Flash

निवड समिती अध्यक्षपदावरून मिसबा-उल-हक पायउतार

मंडळातील कोणत्याही सदस्याच्या दबावामुळे मी पायऊतार होत नाही

(संग्रहित छायाचित्र)

माजी कर्णधार मिसबा-उल-हक पाकिस्तान संघाच्या निवड समिती अध्यक्षपदावरून पायउतार झाला आहे. मात्र मुख्य प्रशिक्षकपदी तो कायम राहणार आहे.

‘‘३० नोव्हेंबर रोजी मी निवड समिती अध्यक्षपदावरून पायऊतार होणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कळवले आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मी पाकिस्तान संघाची निवड करणार आहे. मात्र मला मुख्य प्रशिक्षकपदावर अधिक लक्ष केंद्रित करावयाचे आहे. मंडळातील कोणत्याही सदस्याच्या दबावामुळे मी पायऊतार होत नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय असून यापुढे निवडल्या जाणाऱ्या निवड समिती अध्यक्षाशी पूर्णपणे जुळवून घेईन,’’ असे मिसबाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:23 am

Web Title: misbah stepped down from the chairmanship of the selection committee abn 97
Next Stories
1 न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू जॉन रीड यांचे निधन
2 नेशन्स लीग फुटबॉल : युक्रेनचा स्पेनवर पहिला विजय
3 डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतची विजयी सलामी
Just Now!
X