04 March 2021

News Flash

मिसबाह-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

पत्रकार परिषद घेऊन मिसबाहने आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली.

मिसबाहच्या कर्णधार काळात पाकिस्तानच्या कसोटी संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रमवारीत अव्वल स्थान गाठता आले

पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याची माहिती मिसबाहने दिली आहे. लाहोरच्या गडाफी स्टेडियम येथे पत्रकार परिषद घेऊन मिसबाहने आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका ही माझ्या कसोटी करिअरमधील शेवटची मालिका असणार आहे. पण स्थानिक पातळीवर मी यापुढेही क्रिकेट खेळत राहिन. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणं केव्हा थांबवायचं हे अद्याप ठरवलेले नाही, असे मिसबाहने पत्रकार परिषदेत सांगितले.

 

मिसबाहच्या कर्णधार काळात पाकिस्तानच्या कसोटी संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रमवारीत अव्वल स्थान गाठता आले होते. मिसबाहने पाकिस्तानसाठी आजवर अनेक सामने आपल्या आश्वासक फलंदाजीने जिंकून दिले आहेत. दरम्यान, मिसबाहने आता नवनिर्वाचित कर्णधार सरफराज अहमद याला प्रोत्साहन देण्याची गरज देखील व्यक्त करत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असावा या कल्पनेला पाठिंबा दिला आहे.

सरफराजवर दबाव आणण्यापेक्षा त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्त्व एकाच खेळाडूकडे असावे असे मलाही वाटते. त्यामुळे सरफराझला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तो संघाला खूप चांगली दिशा देऊ शकतो, असे मिसबाह म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 3:02 pm

Web Title: misbah ul haq announces retirement from test cricket
Next Stories
1 युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लालरिंन्नुन्गाला रौप्य पदक
2 रोहितच्या कामगिरीबाबत उत्सुकता
3 भारत-पाकिस्तान मालिका झाल्यास ‘कसोटी’चे भले!
Just Now!
X