News Flash

प्रेक्षकांशिवाय कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा पर्याय

१५ ऑगस्टपासून हे सराव शिबीर सुरू होणे अपेक्षित

संग्रहित छायाचित्र

 

करोनाची परिस्थिती आणखी चिघळली तर पुढील वर्षी भारतात फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा (१७ वर्षांखालील) प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा पर्याय आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) सरचिटणीस कुशल दास यांनी ही माहिती दिली.

‘‘करोना संसर्गाची परिस्थिती आणखी चिघळली तर प्रेक्षकांशिवाय कुमारी विश्वचषक फुटबॉलचे आयोजन करू,’’ असे दास यांनी सांगितले. या वर्षी होणारा कुमारींचा विश्वचषक करोनामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. सद्य:स्थितीत ऑगस्टमध्ये झारखंड किंवा गोवा येथे सराव शिबीर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र झारखंडच्या ८ ते १० खेळाडूंचा भारताच्या संघात समावेश आहे. परिणामी गोव्याऐवजी झारखंडला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे. १५ ऑगस्टपासून हे सराव शिबीर सुरू होणे अपेक्षित आहे.

‘‘करोना संसर्ग पाहता सराव शिबिरात खेळाडूंची तपासणी करणे ही आमची जबाबदारी आहे. करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) विशेष निधी देण्यात आला आहे. त्यातील काही रक्कम खेळाडूंची अधूनमधून तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता वापरणार आहोत,’’ असेही दास यांनी स्पष्ट केले. भारतात २०१७मध्ये कुमारांच्या विश्वचषकाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते.

पुरुषांच्या फुटबॉल संघाच्या विश्वचषकाच्या पात्रता लढती कतारविरुद्ध ऑक्टोबरमध्ये आणि अफगाणिस्तानविरुद्ध नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. त्यानिमित्ताने पुरुष खेळाडूंचे सराव शिबीर भुवनेश्वर येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:12 am

Web Title: miss world cup football tournament without spectators abn 97
Next Stories
1 ऑलिम्पिक पुढील वर्षीच खेळवावे -युरीको
2 बॉक्सिंग संघाच्या डॉक्टरला करोना
3 Umpire’s Call बाबत पुनर्विचार करा, सचिन तेंडुलकरची आयसीसीला विनंती
Just Now!
X