News Flash

धोनीचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ मिस करताय? मग ‘हा’ VIDEO बघाच

शॉट खेळणारा परदेशी फलंदाजही आहे लोकप्रिय

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले. आता टी-२० विश्वचषक झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसेल हे नक्की. पण धोनीचे फॅन्स त्याला खूपच मिस करत आहेत. अशातच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की पहिलं नाव येतं ते धोनीचं. IPL असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले आहेत. पण जुलै २०१९ नंतर धोनी क्रिकेट खेळताना दिसला नसल्याने त्याचा हेलिकॉप्टर शॉटदेखील चाहत्यांनी पाहिलेला नाही. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी जसा हेलिकॉप्टर शॉट खेळतो, तसाच हेलिकॉप्टर शॉट एक फलंदाज मारताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

#OrangeArmy #SRH @rashid.khan19

A post shared by SunRisers Hyderabad (@sunrisershyd) on

हा व्हिडीओ अफगाणिस्तानचा आहे. व्हिडीओमध्ये समोरच्या खुर्च्यांवर ACB (अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड) असे अफगाणिस्तानच्या जर्सीच्या रंगात लिहिले आहे. तसेच सनरायजर्स हैदराबादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या फलंदाजाला म्हणजेच राशिद खानला टॅगदेखील केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 4:58 pm

Web Title: missing ms dhoni helicopter shot you will surely like rashid khan viral video srh ipl 2020 vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : “हा’ संघ ठरेल विजेता”; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा अंदाज
2 “टीम इंडिया’कडे बेन स्टोक्सच्या तोडीचा क्रिकेटर नाही”
3 Video : …अन् ‘तो’ प्रकार पाहून भर मैदानातच रूटला हसू अनावर
Just Now!
X