भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मिताली मैदानात उतरली. या सामन्यादरम्यान मिताली राजने आपल्या वन-डे क्रिकेट कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली आहेत. २६ जून १९९९ साली मिताली आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात पदार्पण केलं होतं.

वडोदरा येखील मैदानात होणाऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय महिलांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन महिलांचा डाव पुरता गडगडला.