News Flash

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मिताली राज संघाची कर्णधार

हरमनप्रीत कौर टी-२० संघाची कर्णधार

भारतीय महिला संघाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी रात्री भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ ३ वन-डे आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. १ ते २० नोव्हेंबर पर्यंत भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिज दौरा रंगणार आहे. सध्या भारतीय महिला संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.

बीसीसीआयने पुन्हा एकदा वन-डे संघाचं नेतृत्व मिताली राजकडे तर टी-२० संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवलं आहे.

वन-डे मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ –

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मंधाना, जेमायमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, पुनम राऊत, डी. हेमलता, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम यादव, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), प्रिया पुनिया, सुषमा वर्मा

टी-२० मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), जेमायमा रॉड्रीग्ज, शाफाली वर्मा, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, वेदा कृष्णमुर्ती, अनुजा पाटील, शिखा पांडे, पुजा वस्त्राकर, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 7:53 pm

Web Title: mithali raj to lead team india as bcci announces womens squad for west indies tour psd 91
टॅग : Harmanpreet Kaur
Next Stories
1 टी-२० विश्वचषकासाठी धोनी फायदेशीर ठरु शकतो – सुरेश रैना
2 माजी आफ्रिकन खेळाडू करणार अफगाणिस्तानच्या संघाला मार्गदर्शन
3 खेळाडू चुकत असेल तर मी बोलणारच ! तबला वाजवायला संघात आलोय का?
Just Now!
X