News Flash

अबब! अवघ्या ९ धावांत संघ All Out, ९ गडी शून्यावर बाद

प्रतिस्पर्धी संघाने ६ चेंडूत जिंकला सामना

क्रिकेट हा खेळ फटकेबाजीसाठी आणि उत्तुंग षटकारांसाठी ओळखला जातो. नव्या बॅटमुले तर सध्या धावांचा रतीब घालणारे अनेक सामने पाहायला मिळतात. गोलंदाजदेखील उल्लेखनीय कामगिरी करतात, पण बोलबाला हा विशेषतः फलंदाजांचाच असतो. अशा परिस्थितीमध्ये एक संघ चक्क ९ धावा करून तंबूत परतला आहे.

मिझोराम विरुद्ध मध्य प्रदेश असा एक महिलांचा टी २० सामना रंगला होता. या सामन्यात मिझोरमच्या संघाला फक्त ९ धावा करता आल्या. मिझोरमचा संघ १३.५ षटकांत पूर्ण बाद झाला. या खेळात मिझोरमकडून अपूर्वा भारद्वाज ही एकमेव धावा करणारी फलंदाज ठरली. या सामन्यात अपूर्वाने २५ चेंडू खेळून एक चौकार मारला आणि ६ धावा केल्या. मात्र इतर ९ फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. या सामन्यात ३ धावा अतिरिक्तदेखील मिळाल्या. मध्य प्रदेशकडून तरंग झा या महिला गोलंदाजाने ४ षटकांमध्ये फक्त दोन धावा खर्चून ४ बळी मिळवले.

मध्य प्रदेशच्या संघाने मिझोरमने दिलेले हे १० धावांचे आव्हान केवळ ६ चेंडू म्हणजेच एका षटकात पूर्ण केले. हा सामना त्यांनी एकही बळी न गमावता जिंकला. फलंदाजीत अत्यंत वाईट कामगिरी करणाऱ्या मिझोरमने गोलंदाजीतही १० पैकी ५ धावा वाईडच्या स्वरुपात दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 6:30 pm

Web Title: mizoram womens team got out on 9 runs in t20 match vs madhya pradesh
Next Stories
1 पाकला पराभूत करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या – सचिन तेंडुलकर
2 IPL 2019 : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ उदघाटन सोहळा रद्द
3 Pulwama Terror Attack : BCCI ला उशिराने शहाणपण; पाक खेळाडूंबाबत घेतला ‘हा’ निर्णय
Just Now!
X