इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने केलेल्या गोलंदाजीमुळे भारताची फलंदाजी गुरुवारी गडगडली आणि तिसऱया कसोटीत इंग्लंडने २६६ धावांनी भारतावर विजय मिळवला. या विजयामुळे मालिकेत आता भारत इंग्लंडमध्ये १-१ अशी बरोबर झाली आहे.
मोईन अलीने ६७ धावांच्या मोबदल्यात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, शमी अहमद आणि पंकज सिंह असे सहा फलंदाज बाद केले. त्यामुळे दुसऱया डावात भारतीय फलंदाज अवघ्या १७८ धावांपर्यंतच मजल मारू शकले. दुसऱया डावात भारताच्या अजिंक्य राहाणे याने बिनबाद सर्वाधिक ५२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव – सात बाद ५६९ डाव घोषित
भारत पहिला डाव – सर्वबाद ३३०
इंग्लंड दुसरा डाव – चार बाद २०५ डाव घोषित
भारत दुसरा डाव – सर्वबाद १७८