News Flash

चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ३ बाद ७५ धावा

* भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी मोहाली येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रलिया चौथ्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि मुरली विजय या भारताच्या दोन युवा फलंदाजांनी दमदार

| March 17, 2013 05:32 am

* भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी
मोहाली येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रलिया चौथ्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि मुरली विजय या भारताच्या दोन युवा फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. शिखर धवनने पदार्पणातचं ८५ चेंडूत शतक ठोकले. पण आपले व्दिशतक पूर्ण करण्यात शिखरला अपयश आले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि भारताचा डाव ४९९ धावांवर सुंपूष्टात आला व भारताने ऑस्ट्रेलियावर ९१ धावांची आघाडी घेतली. कांगारूंची फलंदाजीची वेळ आली असता भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीची जादू दाखवत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ७५ धावा अशी होती.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 5:32 am

Web Title: mohali test fourth day australia 753
टॅग : Indvsaus,Test Cricket
Next Stories
1 रावडी धवन
2 धडा कांगारूंना आणि इतरांनाही!
3 सायना उपांत्य फेरीत
Just Now!
X