पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हफीझच्या गोलंदाजीच्या शैलीची ९ एप्रिल रोजी चेन्नईत चाचणी घेतली जाणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या गोलंदाजीची शैली सदोष असल्याचे निष्पन्न झाले होते व त्याला शैलीत सुधारणा करण्याचा आदेश देण्यात आला होता. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात गतवर्षी झालेल्या कसोटीत त्याची शैली सदोष असल्याचा अहवाल पंचांनी दिला होता.