दुबई येथे सुरू असलेल्या टी१० स्पर्धेत अफगाणच्या मोहम्मद शहजादने काल वादळी फलंदाजी केली. मोहम्मद शहजादची फलंदाजी पाहून अनेकांना २००७ मध्ये युवराज सिंगने केलेल्या फलंदाजीची आठवण झाली. मोहम्मद शहजादने १६ चेंडूत ७४ धावांची वादळी खेळी केली आहे. विशेष म्हणजे मोहम्मद शहजादने केलेल्या या फटकेबाजीने त्याचा संघाने अवघ्या चार षटकांत आणि फक्त १७ मिनीटांत विजय साजरा केला.

७४ धावांच्या वादळी खेळीत शहजादने ८ गगनचुंबी षटकार आणि ६ खणखणीत चौकारांची आतषबाजी केली. शहजादने फक्त १२ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. बुधवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेन वॉटसनच्या २० चेंडूतील ४२ धावांच्या बळावर सिंधी संघाने ९४ धावा केल्य होत्या. विजयासाठी ९५ धावांचा पाठलाग करताना शहजादच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर चार षटकात राजपूत संघाने सामना जिंकला. राजपूत संघाकडून भारताच्या मुनाफ पटेलने २० धावांत तीन विकेट घेतल्या.


शहजादने १६ चेंडूमध्ये एकही निर्धाव चेंडू खेळला नाही. प्रत्येक चेंडूवर धाव घेतली आहे. शहजादच्या फलंदाजीच्या बळावर राजपूत संघाने सिंधी संघावर दहा विकेटने दमदार विजय मिळवला.

शहजादला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात करण्यात आले.