07 July 2020

News Flash

घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान, BCCI ने केलं कौतुक

लॉकडाउन काळात क्रिकेटपटू राखतायत सामाजिक भान

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात, देशातील कामगार व मजुरांना चांगलेच हाल सोसावे लागले. अखेरीस केंद्र सरकारने त्यांना प्रवासाची परवानी दिल्यानंतर बहुतांश राज्यातील कामगार रेल्वे, बस मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत आहेत. घरी परतणाऱ्या या कामगारांची मदत करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती समोर येत आहेत. लॉकडाउन काळात उत्तर प्रदेशात आपल्या घरी अडकलेल्या मोहम्मद शमीने या कामगारांती मदत करण्याचं ठरवलं आहे.

मोहम्मद शमीने आपल्या सहकाऱ्यांसह घराजवळील जागेत मदतकार्याचा मंडप लावलेला आहे. घरी जाणाऱ्या कामगारांना शमी फळं, जेवणाचं पाकीट आणि पाण्याची बाटली अशी मदत करतो आहे.बीसीसीआयनेही मोहम्मद शमीच्या या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.

लॉकडाउन काळात सर्व क्रिकेट सामने सध्या बंद आहेत. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. शमी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रतिनिधीत्व करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 1:29 pm

Web Title: mohammad shami distributes food and masks in up bcci hails the move psd 91
Next Stories
1 ‘फ्लॉप’ क्रिकेटपटूंच्या यादीत नाव टाकल्याने खेळाडूच्या पत्नीचा संताप
2 “आधी डोळ्यांची तपासणी, मग क्रिकेट”; राज्य संघटनेचा निर्णय
3 “जरा तारतम्य बाळगा”; आफ्रिदी, गंभीरला तंबी
Just Now!
X