पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने पाकिस्तानी संघ २०१९च्या विश्वचषक जिंकू शकतो असे मत व्यक्त केले आहे. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेता होईल असे मत युसूफने नोंदवले आहे. यावेळी त्याने २०१७ साली इंग्लंडमध्येच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानने जिंकल्याची आठवण करुन दिली. भारताला अंतिम सामन्यात हरवून पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली तेव्हा कोणालीही पाकिस्तान विजेता होईल असे वाटले नव्हते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाक पॅशन या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये युसूफने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान चांगली कामगिरी करुन स्पर्धा जिंकेल असे सांगितले. मला पाकिस्तान विश्वविजेता होईल असे वाटते कारण पाकिस्तानी संघाची गोलंदाजी उत्तम आहे. विशेष करुन इंग्लंडमधील सपाट खेळपट्ट्यांवर पाकिस्तानी गोलंदाज जास्त प्रभावी ठरतील. पाकिस्तानकडे समतोल साधणारा संघ आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकराचे गोलंदाज आहेत. ते सामन्यामध्ये ठरावीक अंतराने विकेट्स घेऊ शकतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ मैदानात जम बसवू शकत नाही असे युसूफ म्हणाला.

पाकिस्तान विजयी ठरले यासाठी आणखीन एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे, पाकिस्तानचा संघ पार्टटाइम गोलंदाजांवर अवलंबून नाहीय. पाकिस्तानच्या संघात सहा ते सात चांगले गोलंदाज आहेत. विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या खूपच कमी संघांकडे इतके चांगले गोलंदाज असल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळेच पाकिस्तान गोलंदाजीच्या जोरावर सहज सामने जिंकू शकेल असा विश्वास युसूफला वाटतोय.

याच मुलाखतीमध्ये भारतीय संघाबद्दल बोलताना युसूफने २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतीम सामन्याची आठवण करुन दिली. या सामन्यामध्ये ३३९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १५८ धावांवर तंबूत परतला होता. रोहित शर्मा, एम.एस. धोनी, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग यासारखे दिग्गज खेळाडू संघात असतानाही भारताचा केवीलवाणा पराभव झाला होता. याच सामन्याची आठवण करुन देत युसूफ म्हणाल की, पाकिस्तानने भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात पराभव केला होता. भारताकडे चांगले फलंदाज आहेत पण भारतीय गोलंदाजी दुबळी आहे. विशेष करुन भारताकडे जलद गोलंदाजांची कमतरता आहे. मागील काही काळात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची इंग्लंडमधील कमागिरी पाहता ही कमतरता स्पष्टपणे दिसून येते.

मात्र युसूफ पाकिस्तानी संघाच्या विजयाबद्दल आशावादी असला तरी पाकिस्तानी संघाची मागील एक वर्षाची कामगिरी या दाव्याला शोभणारी नाहीय. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा ५-०ने पराभव झाला. पाकिस्तानने झिम्बॉबवे विरुद्धची मलिका जिंकली असली तरी दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानची फलंदाजी टिकेल असे चित्र सध्या तरी दिसत नाहीय. म्हणूनच युसूफच्या या आत्वविश्वासावर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत त्याच्या या दाव्याची चेष्टा केली आहे.

कोणीतरी यांना आठवण करुन द्या…

काहीही हा युसूफ

पाकिस्तानी संघाची याची दखल घ्यावी

खरंच

हा स्कोअरकार्ड ही पाहा

असचं झालं असावं

मग तर आर्यलॅड पण फेव्हरेट आहे

पाकिस्तान व्यतिरिक्त घरच्या मैदानावर खेळाणाऱ्या इंग्लंडच्या संघाला चांगली संधी असल्याचे युसूफ म्हणाला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघही चांगली कामगिरी करत असून तोही विश्वचषकाच्या मुख्य दावेदारांपैकी एक आहे. मात्र विश्वचषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या खेळाडूंना चांगला खेळ करणे गरजेचे असल्याचेही युसूफने सांगितले.