ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कसोटी मालिका ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे टी२० संघात नसलेला पण कसोटी संघात समाविष्ट असलेला गोलंदाज मोहम्मद शमी याच्याबाबत BCCI ने एक नियम केला होता. रणजी सामन्यात एका डावात गोलंदाजी करताना शमीने केवळ १५ ते १७ षटके फेकायची अशी अट BCCI ने घातली होती. मात्र शमीने एका डावात २६ षटके फेकत तो त्याचा ‘स्वतःचा’ निर्णय असल्याचे म्हटले.

मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या टी२० मालिकेचा भाग नसल्याने तो दरम्यानच्या काळात रणजी करंडकाच्या बंगाल विरुद्ध केरळ या सामन्यात खेळत आहे. या सामन्यासाठी शमीकडून एका डावात केवळ १५ षटकेच टाकून घ्यायची, असे BCCIने बंगालच्या संघाला सूचना केली आहे. पण त्याने २६ षटके फेकली. याबाबत तो म्हणाला की तुम्ही तुमच्या राज्यासाठी खेळत असताना तुम्ही तुमची जबाबदारी पार पडणे महत्वाचे असते. मी तंदुरुस्त होतो त्यामुळे मी माझा निर्णय घेतला आणि २६ षटके आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी शमीला गोलंदाजीचा अधिक ताण पडू नये. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तंदुरुस्त आणि ताजातवाना राहावा यासाठी BCCIने ही सूचना बंगालच्या संघाला केली आहे. शमी भारतातच असल्याने त्याला रणजी सामन्यात बंगालकडून खेळायची परवानगी द्यावी, अशी मागणी बंगाल क्रिकेट संघटनेने BCCIकडे केली होती. त्यावर त्याच्याकडून एका डावात १५ ते १७ षटके टाकून घेण्याच्या अटीवर खेळण्याची परवानगी दिली होती.