भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज महम्मद शमीचा अमेरिकन व्हिसा पोलीस रेकॉर्ड्सच्या आधारावर रद्द करण्यात आला होता. शमीवर घरगुती हिंसाचार आणि लैगिक अत्याचाराशी निगडीत तक्रार दाखल असल्याने त्याला अमेरिकन दुतावासाने व्हिसा नाकारला होता. परंतु बीसीसीआयच्या मध्यस्थीनंतर शमीला अमेरिकन व्हिसा देण्यात आला आहे.

अमेरिकेत भारत टी -20 चे तीन सामने खेळणार आहे. या संघात शमीची निवड झाल्याने त्याने अमेरिकन व्हिसासाठी अर्ज केला होता. परंतु अमेरिकन दुतावासाने त्याला व्हिसा नाकारला. शमीच्या विरोधात त्याची पत्नी हसीन जहाँने घुरगुती हिंसाचार आणि लैगिक अत्याचाराचा खटला दाखल केला आहे. याच कारणांमुळे त्याला व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्या मदतीनंतर शमीला व्हिसा देण्यात आला आहे.

शमीचा व्हिसा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी अमेरिकन दुतावासाला पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच यामध्ये शमीच्या कामगिरीबद्दल तसेच विश्वचषकातील खेळाबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन दुतावासाकडून त्याला व्हिसा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.