News Flash

दुसर लग्न करायला तुम्हाला मी वेडा वाटतो का? – मोहम्मद शमी

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वादाच गुऱ्हाळ अद्यापही सुरुच आहे. संधी मिळताच दोघेही परस्परांना आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वादाच गुऱ्हाळ अद्यापही सुरुच आहे. संधी मिळताच दोघेही परस्परांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ईदनंतर मोहम्मद शमी त्याच्या भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करणार असल्याचा आरोप हसीन जहाँने केला आहे. मोहम्मद शमी पैसे द्यायला तयार असून त्याने घटस्फोट मागितल्याचा दावाही हसीनने केला आहे.

पत्नीच्या या आरोपाबद्दल विचारले असता शमीने गमंतीशीर उत्तर दिले. मी माझ्या पहिल्या लग्नामुळेच इतका त्रस्त आहे, त्यात दुसरे लग्न करायला मी तुम्हाला वेडा वाटतो का ? असा प्रतिप्रश्न शमीने केला. मागच्या काही महिन्यात हसीनने माझ्यावर भरपूर आरोप केले आहेत. त्यात आता हा एक नवीन आरोप आहे. मी दुसरे लग्न करणार असीन तर त्या लग्नाला उपस्थित राहायला मी हसीनला निमंत्रण देईन असे शमीने गंमतीने म्हटले.

शमीला यंदाच्या आयपीएलमध्येही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना शमी फक्त चार सामन्यांमध्ये खेळला. त्यात त्याने तीन विकेट काढल्या. व्यक्तीगत आयुष्यातील समस्यांमुळे मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नाहीय. शमीची नजर इंग्लंड दौऱ्यावर आहे. कौटुंबिक समस्यांमुळे मी मागच्या काही महिन्यात चांगली कामगिरी करु शकलेलो नाही. पण इंग्लंड दौऱ्यात परिस्थिती बदलेल याचा मला नक्कीच विश्वास आहे असे शमी म्हणाला. यावर्षी जानेवारी महिन्यात शमी भारताकडून शेवटचा खेळला होता. तीन कसोटी सामन्यात शमीने १५ विकेट घेतल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 5:12 pm

Web Title: mohammed shami hasin jahan second marriage
टॅग : Mohammed Shami
Next Stories
1 Rafael Nadal : नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोडला ‘हा’ नियम ?
2 आज भारतानं जिंकली होती लॉर्डसवर पहिली कसोटी, वेंगसरकरांची खेळी अजून स्मरणात
3 BLOG : सरकारी नोकरीतील आरक्षणासाठी आट्यापाट्या खेळाडूंचा आटापिटा!
Just Now!
X