आयपीएलमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूच्या नटराजन यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वांना प्रभावित केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नटराजनं यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकूश ठेवला. नटराजन याने दोन टी-२० सामन्यात पाच विकेट घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. नटराजनची गोलंदाजी पाहून भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग प्रभावित झाला आहे. विरेंद्र सेहवागच्या मते पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात शामाऐवजी नटराजनला संधी द्यावी.

एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु होण्यापूर्वी एकदिवस आधी नटरजानला भारीतय संघात स्थान मिळालं आहे. मालिकेतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नटराजन यानं भारतीय संघाकडून पदार्पण केलं. लगेच टी-२० सामन्यातही त्याचं पदार्पणही झालं. नटराजनने पहिल्या दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या. नटराजनची गोलंदाजी पाहून सेहवागही प्रभावित झाला आहे. पुढील वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकासाठी विरेंद्र सेहवागनं आपले तीन गोलंदाज निवडे आहेत. यामध्ये सेहवागनं नटराजनला संधी दिली आहे.

विरेंद्र सेहवागनं बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि नटराजन हे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज निवडले आहेत. भारतीय संघात सध्या नवदीप सैनी, चहर, शार्दुल ठाकूर आणि शामीसारखे वेगवान गोलंदाज आहेत.  सेहवागनं पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात शामीऐवजी नटरजनला संधी दिली आहे. सोनी नेटवर्कच्या क्रिकेट टॉक शोमध्ये बोलताना सेहवाग म्हणाला, ‘टी20 विश्वचषकासाठी भारताकडे गोलंदाजीमध्ये विविध पर्याय आहेत. नटराजन बुमराह आणि भुवनेश्वरकुमारसोबत भारतानं उतरावं. नटराजनची गोलंदाजीवर धावा काढताना फलंदाजाला मेहनत करावी लागते. नटराजन योग्य टप्यावर गोलंदाजी करतोय. यॉर्कर, स्लोअर किंवा लेंथ चेंडू व्यवस्थित टाकत आहे. नटराजनच्या समावेशामुळे भारतीय गोलंदाजीत विविधता येईल. ‘