News Flash

“रोहितचं चरित्रच वेगळं, तो एक cool माणूस”

भारताच्या वेगवान गोलंदाजाला रोहितच्या नेतृत्वाची भूरळ

रोहित शर्मा

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. रोहित गोलंदाजांना मुक्तपणे गोलंदाजी करू देतो, असे शमी म्हणाला. ३० वर्षीय शमी दुखापतीतून सावरला असून तो आयपीएल २०२१मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौर्‍यासाठी शमीचा संघात समावेश आहे.

शमी म्हणाला, “एक गोलंदाज म्हणून जेव्हा मी रोहितकडे सल्ला घेण्यासाठी जातो, तेव्हा तो नेहमीच सकारात्मक उत्तरे देतो. रोहित नेहमीच गोलंदाजला आपल्या मनाप्रमाणे करण्यास सांगतो. मला वाटते वेगवान गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे फार महत्वाचे आहे.”

शमी म्हणाला, “रोहितचे चरित्रच वेगळे आहे आणि तो एक कूल माणूस आहे. परंतु फलंदाजी करताना तो शांत राहत नाही. वेगवान गोलंदाज सहसा आक्रमक असतात, पण असा एक खेळाडू आणखी आक्रमक असतो, तो म्हणजे आमचा कर्णधार आहे. विकेट घेतल्यानंतर विराट आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन करत असल्याचे मी सोशल मीडियावर पाहिले. एकदा मी त्याला मस्करीत विचारले होते, की ही विकेट मी घेतलीय की तू?”

शमी पुढे म्हणाला, “विकेट घेतल्यानंतर गोलंदाजांपेक्षा विराट अधिक आनंद साजरा करतो. मैदानावर मौजमजा करणे महत्त्वाचे आहे. कोहलीकडे आक्रमकता आहे. तो संघाचे उत्कृष्ट नेतृत्व करत आहे. तो एक आक्रमक फलंदाजदेखील आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 5:28 pm

Web Title: mohammed shami praises rohit sharma saying that he gives freedom to bowlers adn 96
Next Stories
1 टी-२० वर्ल्डकपचं भवितव्य काय? BCCI ‘या’ तारखेला घेणार बैठक
2 “ही तुमच्या काकाची टीम नाही…”, शोएब अख्तरचा घणाघात
3 एक नव्हे, दोन नव्हे, तर पुढील तीन जन्म गांगुलीला करायचीय ‘ही’ गोष्ट!
Just Now!
X