क्रिकेटर मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँमधील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. पत्नी हसीन जहाँने पुन्हा एकदा मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करत अडचणीत आणले आहे. परंतू या वेळी हसीनने शमीला भर रस्त्यात मारायला हवेत, असे धक्कादायक वक्तव्य केले.
मोहम्मद शमीला अडचणीत आणणाऱ्या हसीनने पुन्हा एकदा शमीवर टीका केली. हसीन म्हणाली की, ” अलिश्बा ही काही शमीची चाहती नसून ती शमीची प्रेयसी आहे, जर एक मुलगी पुरुषाला लपून भेटत असेल तर हे प्रकरण फक्त ब्रेकफास्टपर्यंत मर्यादित राहीलेले नसून, हे प्रकरण अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचलेले आहे. शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना फसवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर रस्त्यात मारायला हवेत.”

काही दिवसांपूर्वी हसीनने फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरील संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर करत शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. तिने शमीचे त्या तरुणींसोबतचे छायाचित्र देखील पोस्ट केले होते. त्या तरुणी शमीच्या प्रेयसी असल्याचे हसीनने सांगितले होते. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शमी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असा गंभीर आरोप तिने केला होता. तर पाकिस्तानच्या अलिश्बाने तिच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली होती. मी फक्त शमीची चाहती आहे आणि त्याच हेतूने मी शमीला भेटले. मला वाटत नाही कि,ही फार मोठी गोष्ट आहे असे अलिश्बाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. एक व्यक्ति म्हणून मी शमीचा आदर करते. आम्ही चांगले मित्र आहोत.  तो कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे तिने सांगितले.