News Flash

फ्रेंच लीग फुटबॉल : मोनॅकोची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

मोनॅकोकडून तीन वर्षांपूर्वी पॅरिस सेंट जर्मेनमध्ये दाखल झालेल्या एम्बाप्पेने संघासाठी ९९वा गोल लगावला

(संग्रहित छायाचित्र)

 

किलियन एम्बाप्पे याने दोन गोल करूनही फ्रेंच लीग फुटबॉलमध्ये आघाडीवर असलेल्या पॅरिस सेंट-जर्मेनला मोनॅकोकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.

मोनॅकोकडून तीन वर्षांपूर्वी पॅरिस सेंट जर्मेनमध्ये दाखल झालेल्या एम्बाप्पेने संघासाठी ९९वा गोल लगावला. त्याने पहिल्या सत्रातच दोन गोल करून पॅरिस सेंट-जर्मेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या सत्रात मोनॅकोने शानदार पुनरागमन के ले. के व्हिन वोलँडने दोन गोल करत मोनॅकोला बरोबरी साधून दिली. त्यानंतर सेस्क फॅ ब्रेगस याने ८४ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत मोनॅकोला विजय मिळवून दिला. पराभवानंतरही पॅरिस सेंट जर्मेन २४ गुणांसह अग्रस्थानी असून मोनॅकोने २० गुणांनिशी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

अब्राहमच्या गोलमुळे चेल्सी विजयी

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

न्यूकॅसल : टॅमी अब्राहमने साकारलेल्या गोलमुळे शनिवारी चेल्सीने न्यूकॅसलचा २-० असा पाडाव करीत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या गुणतालिकेत अग्रस्थान कायम राखले आहे. न्यूकॅसलच्या फेड्रिको फर्नाडिजच्या स्वयंगोलमुळे चेल्सीचे खाते उघडले. त्यामुळे चेल्सीने सामन्याच्या १०व्या मिनिटालाच आघाडी मिळवली. फर्नाडिजने या गोलबाबत दाद मागण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. चेल्सीच्या टिमो वेर्नेरला दोन गोल नोंदवण्यात अपयश आले. पहिल्या प्रयत्नात संधी निसटली, तर दुसऱ्या प्रयत्नात झालेला गोल ऑफ-साइड ठरवण्यात आला. त्यानंतर ६५व्या मिनिटाला चेल्सीच्या खात्यावर दुसऱ्या गोलची नोंद केली. सलग तिसऱ्या सामन्यात अब्राहमने गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:11 am

Web Title: monaco beat paris saint germain abn 97
Next Stories
1 ती खुन्नस त्या क्षणापर्यंत मर्यादीत होती, IPL मधील गाजलेल्या द्वंद्वावर सूर्यकुमारने सोडलं मौन
2 ‘विरूष्का’च्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर
3 सूर्यकुमारने ‘टीम इंडिया’त संधी न मिळण्याच्या मुद्द्यावर अखेर सोडलं मौन, म्हणाला…
Just Now!
X