स्टेफानोस त्सित्सिपासने एकही सेट न गमावता माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. चौथ्या मानांकित त्सित्सिपासने रविवारी अंतिम सामन्यात आंद्रे रुब्लेव्हचा ६-३, ६-३ असा पराभव केला. त्सित्सिपासचे हे वर्षातील पहिले आणि एकंदर सहावे जेतेपद ठरले. ग्रीसच्या २२ वर्षीय त्सित्सिपासने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात अखेरचे जेतेपद पटकावले होते. त्सित्सिपासने गतवर्षी फेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही रुब्लेव्हला नमवले  होते.