सचिन तेंडुलकरला आऊट करायचा सगळ्यात चांगला वेळ कोणता, याचा खुलासा इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसारने केला आहे. सचिन खेळतांना त्याला बर्‍याच गोलंदाजांचा अभ्यास होता. तो टीकून आणि संयमाने बॅटींग करत असे. दरम्यान,मॉन्टी पानेसार आणि जेम्स अँडरसन सचिनला बाद करण्यासाठी योजना आखत असत. पानेसारने याबाबत माहिती दिली आहे.  अँडरसनने तेंडुलकरला कसोटीत नऊ वेळा बाद केले तर पानेसारने ११ कसोटी सामन्यात ४ वेळा बळी टिपला आहे.

पानेसार म्हणाला “तेंडुलकरला आऊट करने कठीण होते. त्या इंग्लंडचे त्याच्या फलंदाजीत एक विशिष्ट पद्धतीची जाणीव झाली. अँडरसन आणि मी सचिनला बर्‍याचदा बाद करण्याचा प्रयत्न केला.”

“कसोटी क्रिकेटमध्ये इंटरव्हल होत असे, पहिल्या पाच मिनिटाच्या इंटरव्हलनंतर जेव्हा सचिन खेळण्यास सज्ज होत होता. तेव्हा तोच त्याला बाद करण्याचा योग्यवेळ होता. उपाहार आणि चहापान नंतर पहिले पाच मिनिटे निर्णायक असायचे. हे एका कारसारखे होते. ज्याला गरम होण्यासाठी ५,७ मनिटे लागतात. यात चुकलात की मग तुम्ही रोखू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला पुढच्या इंटरव्हलची वाट बघावी लागते” असे पानेसारने सांगितले.

३८ वर्षीय जेम्स अँडरसननं बदलला इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटचा इतिहास

ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे. ३८ वर्षीय अँडरसन इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. या विक्रमासह त्याने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकची बरोबरी साधली. कुकने आपल्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अँडरसन खेळला, तर तो कुकलाही मागे टाकत मोठ्या पराक्रमाची नोंद करेल.