News Flash

क्रीडा क्षेत्राला अधिक निधी -रिजिजू

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या क्रीडापटूंच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यात येईल

(संग्रहित छायाचित्र)

यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडाविषयक तरतुदीत कपात करण्यात आली असली तरी समाधानकारक आहे. हे ऑलिम्पिक वर्ष असल्यामुळे आवश्यकता भासल्यास आम्ही सरकारकडून अधिक निधीची मागणी करू, असे आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिले.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या क्रीडापटूंच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यात येईल, असे रिजिजू यांनी सांगितले. केंद्र सरकारने सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २५९६.१४ कोटी रुपयांची तरतूद करताना २३०.७८ कोटी रुपये कपात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:11 am

Web Title: more funds to the sports sector rijiju abn 97
Next Stories
1 कर्णधाराला साथ देणे, हेच माझे कर्तव्य -रहाणे
2 भारत की इंग्लंड… कोण मारेल बाजी? दिग्गज क्रिकेटपटूने दिलं उत्तर
3 अशोक दिंडाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
Just Now!
X