04 August 2020

News Flash

दुखापतीमुळे मॉर्केलची माघार

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज मॉर्नी मॉर्केल मांडीला झालेल्या दुखापतीमुळे

| June 8, 2013 03:30 am

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज मॉर्नी मॉर्केल मांडीला झालेल्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात मॉर्केल १० षटके पूर्ण करू शकला नव्हता. तो फलंदाजीला आला मात्र त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. मॉर्केलच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून, त्यातून सावरण्यासाठी त्याला तीन आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. याआधी डेल स्टेनही दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. स्टेन आणि मॉर्केल ही बिनीची वेगवान गोलंदाजांची जोडी खेळू न शकल्यास दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुखापतग्रस्त मॉर्नी मॉर्केलच्या जागी अष्टपैलू ख्रिस मॉरिसची निवड करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2013 3:30 am

Web Title: morne morkel ruled out icc champions trophy due to quad strain
Next Stories
1 कुंद्राच्या कबुलीने धक्का बसला! -जगदाळे
2 .. आणि राज-शिल्पाच्या ‘ट्विटर’बाजीचा फुगा फुटला!
3 सट्टेबाज केशू नी सट्टेबाजीत कोटय़वधी रुपयांचे व्यवहार
Just Now!
X