30 October 2020

News Flash

मॉस्कोच्या तयारीवर फिफा अध्यक्ष संतुष्ट

नवनिर्वाचित अध्यक्ष गियानी इन्फँटीनो यांनी २०१८ साली रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची मंगळवारी पाहणी केली.

| April 20, 2016 03:45 am

नवनिर्वाचित अध्यक्ष गियानी इन्फँटीनो यांनी २०१८ साली रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची मंगळवारी पाहणी केली.

विश्वचषक स्पध्रेचा आढावा
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) नवनिर्वाचित अध्यक्ष गियानी इन्फँटीनो यांनी २०१८ साली रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची मंगळवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी मॉस्को येथील फुटबॉल स्टेडियमला भेट दिली आणि स्पर्धा तयारीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘मॉस्को येथील स्टेडियमची मी पाहणी केली आणि येथील कामाने मला प्रभावित केले आहे. त्यामुळे शहराच्या महापौरांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो. स्टेडियमच्या आत प्रवेश करताच फुटबॉलमय वातावरणाची प्रचिती येते. हे सर्वोत्तम स्टेडियम आहे,’ अशी प्रतिक्रीया इन्फँटीनो यांनी दिली.
रशियाचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष वायटली मुत्को यांनीही नियोजनानुसार तयारी सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘ज्या प्रकारे तयारी सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत. काय आणि किती काम झाले आहे, हे प्रत्येकजण पाहू शकतो.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:45 am

Web Title: moscow get green light from infantino over 2018 world cup
Next Stories
1 ऑलिम्पिक पात्रतेसाठी वेटलिफ्टिंगपटू सज्ज
2 ‘ट्वेन्टी-२० पलीकडेही क्रिकेट असते हे भारतीय संघ विसरलायं’
3 कोलकाताचे लक्ष्य.. अव्वल स्थान
Just Now!
X