24 November 2020

News Flash

ख्रिस गेल नव्हे तर ‘या’ फलंदाजाने मारले सर्वाधिक षटकार

सामन्यावेळी षटकारांचा पाऊस पडला नाही तर तो सामना नीरस होतो

क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारामुळे सामन्यात चांगलीच रंगत येते. चाहते तर स्टेडिअम डोक्यावर घेतात. जर सामन्यावेळी षटकारांचा पाऊस पडला नाही तर तो सामना नीरस होतो, हे अनेकवेळा दिसून आले आहे.

क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारामुळे सामन्यात चांगलीच रंगत येते. चाहते तर स्टेडिअम डोक्यावर घेतात. जर सामन्यावेळी षटकारांचा पाऊस पडला नाही तर तो सामना नीरस होतो, हे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे हल्ली क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे काही फलंदाज आहेत. हे फलंदाज काही काळ जरी विकेटवर टिकून राहिले तर चाहत्यांचे मनोरंजन नक्कीच होते. आता जर तुम्हाला विचारलं की, सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ? तर एका क्षणात तुम्ही लगेच ख्रिस गेलचं नाव घ्याल. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. गेल अजूनही षटकार मारण्यात मागे आहे. जाणून घेऊयात कोण आहे षटकारांचा बादशाह…

शाहिद आफ्रिदी (१९९६-२०१६): पाकिस्तानचा या स्फोटक फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत एकूण ५२३ आंतरराष्ट्रीय सामन्यातील ५०७ डावांत ४० वेळा नाबाद राहत ११,१८५ धावा कुटल्या. यादरम्यान तयाने ११४.१६ च्या स्ट्राईकने १०५२ चौकार आणि ४७६ षटकार लगावले. शतक-११, अर्धशतक- ५१.

ख्रिस गेल (१९९९-२०१७): जगभरातील दिग्गज गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने आतापर्यंत ४३१ सामन्यांतील ५०२ डावांत फलंदाजी केली. यादरम्याने त्याने ७५.७० च्या स्ट्राईकने १८,२२३ धावा बनवल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत ४५४ षटकार आणि २२३६ चौकार ठोकले. शतक-३९, अर्धशतक-९८

ब्रँडेन मॅक्युलम (२००२-२०१६): न्यूझीलंडचा या आक्रमक फलंदाजाने ४३२ सामन्यातील ४७४ डावांत ४७ वेळा नाबाद राहत १४,६७६ धावा बनवल्या. यादरम्यान त्याने ८२.११ च्या स्ट्राईकने ३९८ षटकार आणि १५५२ चौकार लगावले. शतक- १९, अर्धशतक- ७६

सनथ जयसुर्या (१९८९-२०११): श्रीलंकेच्या या महान फलंदाजाने ५८६ सामन्यातील ६५१ डावांत २१,०३२ धावा केल्या आहेत. यादरम्याने त्याने ८१.१३ च्या स्ट्राईकने ३५२ षटकार आणि २४८६ चौकार लगावले. शतक-४२, अर्धशतक १०३

महेंद्रसिंह धोनी (२००४-२०१७): भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील महान यष्टिरक्षकाने ४८८ सामन्यातील ४८७ डावांत १६,१३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीने ७८.६१ च्या स्ट्राईकने १४०३ चौकार आणि ३३७ षटकार ठोकले. शतक-४२, अर्धशतक-१०३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 3:00 pm

Web Title: most sixes in career combined test odi and t20 records in cricket
Next Stories
1 बुद्धिबळाचे ‘बोध’ चिन्ह!
2 स्मिथच्या शतकामुळे इंग्लंड विजयापासून वंचित
3 Ranji Trophy Final : विदर्भच्या रजनीश गुरबानीने रचला इतिहास; दिल्लीविरुद्ध बळींची साधली हॅटट्रिक
Just Now!
X